उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर अनेक नामवंत लोकांनीही तिच्यावर टीका केली.

सतत चर्चेत असूनही उर्फीने तिच्या लव्ह लाईफबद्दल फारशी माहिती कधीच दिलेली नाही. उर्फीचं नाव हे बऱ्याच लोकांबरोबर जोडलं गेलं पण त्यात अजिबात तथ्य आढळून आलं नाही. आता उर्फी एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे या चर्चेला उधाण आलं आहे.

Weeding Viral Video
‘तिच्या लग्नातील मंगलाष्टके ऐकताच…’ त्याला अश्रू झाले अनावर; शेवटी हुंदके देत रडला… काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Aai Kuthe Kay Karto Fame Actor Went To North Finland
बॉर्डर क्रॉस केली अन्…; मराठी अभिनेता पत्नीसह ‘असा’ पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया! फोटो एकदा पाहाच…

आणखी वाचा : “आमच्यासाठी चाहत्यांचं प्रेमच…” चित्रपटसृष्टीतील राजकारणाविषयी धर्मेंद्र यांनी व्यक्त केली नाराजी

उर्फी ही तिची खास मैत्रीण काजोलला डेट करत असल्याची चर्चा आहे. उर्फी तिच्याबरोबर बाहेर गेल्यावर किंवा डिनरला गेल्यावर फोटो पोस्ट करत असते. या फोटोमधील केमिस्ट्री पाहून या दोघी एकमेकांच्या मैत्रिणी नक्कीच नाहीत असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. याबरोबरच दोघीही एकमेकींबरोबर वीकेंड एकत्र घालवतात.

urfijaved-post
फोटो : सोशल मीडिया

काही दिवसांपूर्वी उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काजोलला कीस करतानाचा एक फोटो स्टोरी म्हणून पोस्ट केला होता. या फोटोत या दोघींमधील केमिस्ट्री पाहता या दोघी डेट करत असल्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. काजोलला कीस करतानाचा हा फोटो व्हायरल झाल्याने उर्फी बायसेक्शुअल असल्याचंही म्हंटलं जात आहे. उर्फीने अद्याप तिच्या या रिलेशनशीपबद्दल कुठेही खुलासा केला नसला तरी या व्हायरल फोटोमुळे तिच्या या नव्या नात्याची चांगलीच चर्चा होत आहे.

Story img Loader