दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. डिअर कॉम्रेड व गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
रश्मिका व देवरकोंडाच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरुन त्यांनी गुपचूप लग्न उरकलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रश्मिका व देवरकोंडा या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नववधू व वराच्या पोशाखात दिसत आहेत. शिवाय लग्नात वर-वधू एकमेकांना घालतात तसे हारही त्यांच्या गळ्यात दिसत आहेत. त्यामुळे ते खरंच विवाहबंधनात अडकले की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हेही वाचा >> समीर चौगुलेंच्या हास्यजत्रेतील ‘त्या’ डायलॉगवर मुंबई पोलिसांनी बनवला भन्नाट मीम, पोस्ट शेअर करत म्हणाले…
हेही वाचा >> Video: ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्रीचा पतीसह लिपलॉक करतानाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात…
रश्मिका व देवरकोंडाचा फोटो व्हायरल होत असून एका फॅन पेजवरुन तो शेअर करण्यात आला आहे. परंतु, रश्मिका व देवरकोंडाने लग्न केलं नसून व्हायरल होणारा फोटो हा त्यांच्या चाहत्यानेच फोटोशॉप केलेला आहे. रश्मिका-देवरकोंडाचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांच्यात वर्षभरापूर्वीच ब्रेकअप झालं आहे. परंतु, लायगर फ्लॉप ठरल्यानंतर हे कपल पुन्हा जवळ आले असून त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.