विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपची जेवढी चर्चा झाली नाही त्याहून जास्त चर्चा त्यांच्या लग्नाची आणि रिसेप्शनची झाली. सध्या हे दोघंही केपटाऊनमध्ये आहेत. या दोघांचे आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याच्या गळ्यात एक साखळी दिसतेय. या साखळीमध्ये त्याने साखरपुड्याची अंगठी अडकवली आहे. पण विराटला असे का केले याचं कारण तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हीही त्याचे कौतुकच कराल.
https://www.instagram.com/p/BddPdY3ANlj/
विरुष्काच्या चाहत्याने इन्स्टाग्रामवर विराटचा एक फोटो शेअर केला. सामन्याची प्रॅक्टीस करताना तो अनुष्काची अंगठी गळ्यात घालतो. विराटला ही अंगठी काढून ठेवायची नव्हती त्यामुळेच त्याने साखळीत अंगठी घालून ती गळ्यात घालण्याचा पर्याय निवडला. गेल्या महिन्यात ११ डिसेंबरला इटलीमध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नाला मोजून ४४ मंडळीच उपस्थित होती. यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये दणक्यात रिसेप्शन पार्टी दिली होती. सध्या विराट दक्षिण आफ्रिकेत आगामी कसोटी सामन्यांच्या तयारीमध्ये आहे तर अनुष्का सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
दरम्यान तिथल्या रस्त्यांवरील विराटचा भांगडा असो, अनुष्काची शॉपिंग असो किंवा दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ, असे बरेच फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर अक्षय कुमारसुद्धा पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत केप टाऊनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. नववर्षाचे सेलिब्रेशन आणि ट्विंकलचा वाढदिवस या निमित्ताने ते केप टाऊनला गेले आहेत. एकाच शहरात असल्याने अक्षयने विरुष्काची भेट घेतली. दुपारच्या जेवणासोबत गप्पा मारतानाचा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.