सध्या देशाचं नव्हे तर जगभरातील लोकांचं अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे लक्ष लागलं आहे. आज मुकेश व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Wedding) लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबातील सदस्य लग्नस्थळाकडे रवाना होताना दिसत आहेत. पण अशातच ईशा अंबानीने (Isha Ambani) परिधान केलेल्या एका लेहेंग्याची चर्चा खूप रंगली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाआधी झालेल्या शिव शक्ती पूजेला ईशाने परिधान केलेल्या या लेहेंग्याला ४ हजार तास तयार करायला लागले होते. ईशाच्या या लेहेंग्याची काय वैशिष्ट्ये आहेत? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी बरेच कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने पूजा झाली. त्यापैकी एक म्हणजे शिव शक्ती पूजा. बुधवारी १० जुलैला अँटिलिया बंगल्यावर शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेत अंबानी कुटुंबासह पाहुणे मंडळी शिव भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. हर हर महादेव अशा जयघोषात शिव शक्ती पूजा पार पडली. या पूजेला ईशा अंबानीने सुंदर असा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा दिल्ली विंटेजने तयार केला होता, ज्याचे डिटेलिंग खूप उत्कृष्ट रित्या आणि जबरदस्त करण्यात आले होते. अंबानींच्या लाडक्या मुलीने परिधान केलेल्या या लेहेंग्याला तयार करण्यासाठी ४ हजार तास लागले होते. पारंपरिक पद्धतीने ईशाचा लेहेंगा तयार केला होता.

हेही वाचा – Video: चांदीचं नाणं अन्…; अनंत अंबानींच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळाली खास भेटवस्तू, पाहा व्हिडीओ

ईशा अंबानीच्या या लेहेंग्यावर ट्री ऑफ लाईफ बनवण्यात आलं होतं. तसंच त्याच्या खाली भगवान महादेवाचा नंदी पाहायला मिळत आहे लेहेंग्याच्या एका बाजूला मंदिर असून दुसऱ्या बाजूला पक्षी दिसत आहेत. या लेहेंग्याला तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कापडाचा वापर करण्यात आला होता. तसंच त्यावर भरतकाम करण्यात आलं होतं. शिवाय लेहेंग्याला काही जुनी नाणी आणि विंटेज गोष्टींचा वापर करून एक रॉयल लूक देण्यात आला होता. त्यामुळे ईशा अंबानींच्या सौंदर्यात ते आणखी भर घालतं होतं.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: आकर्षक विद्युत रोषणाईने सजला अनंत-राधिकाचा लग्नमंडप, व्हिडीओ आला समोर

ईशा अंबानीच्या लेहेंग्यावर आहे खास श्लोक (Isha Ambani Lehenga)

शिव शक्ती पूजेसाठी ईशा अंबानीने परिधान केलेल्या लेहेंग्यावर संस्कृत श्लोक लिहिण्यात आला होता. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा श्लोक लिहिला होता. या श्लोकचा अर्थ असा आहे की, कर्म करण्याचा अधिकार धर्माने प्राप्त असल्यानं ते सत्कर्म करताना त्याच्या फलाची चिंता करू नये. सध्या ईशा अंबानीचा या लेहेंग्यातील लूक खूप चर्चेत आला असून कौतुक केलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha ambani lehenga took a total of 4000 man hours to complete anant ambani and radhika merchant wedding pps