सध्या मुकेश व नीता अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. १२ जुलैला मुंबईत मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीच्या विधींना आतापासूनच सुरुवात झाली आहे. अशातच मुकेश व नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानीने एक मोठा खुलासा केला आहे. आयव्हीएफद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याचा खुलासा ईशाने एका मुलाखतीमधून केला आहे.
ईशा अंबानीचं लग्न आनंद पिरामलशी झालं असून दोघांना दोन जुळी मुलं आहेत. कृष्णा व आदिया असं दोघांचं नाव आहे. नुकतंच ईशाने ‘वोग इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी तिने आयव्हीएफद्वारे दोन जुळी मुलं झाल्याचा खुलासा केला. आयव्हीएफच्या माध्यमातून झालेल्या गर्भधारणेबद्दल ईशा अनुभव सांगत म्हणाली, “हा एक कठीण प्रवास होता. माझी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली हे मी खूप लवकर सांगतेय. कारण ही सर्वसाधारण प्रक्रिया मानली जावी. या प्रक्रियेबद्दल कोणालाही वेगळं काही किंवा लाजिरवाण वाटू नये. ही एक अवघड प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही यातून जात असतात तेव्हा हा काळ तणावग्रस्त होता.”
पुढे ईशा अंबानीने आयव्हीएफ विषयी खुलेपणानं बोललं पाहिजे याबाबत सांगितलं. ती म्हणाली, “जितकं आपण याविषयी चर्चा करून तितकं जास्त ती सर्वसाधारण प्रक्रिया होईल. आज जगभरात आधुनिक तंत्रज्ञान आहे; तर मुलं होण्यासाठी याचा वापर का केला जाऊ नये? ही अशी सर्वसाधारण गोष्ट झाली पाहिजे, ज्यामुळे तुम्ही उत्साही व्हालं. ही अशी गोष्ट नाहीये, जी तुम्हाला लपवावी लागेल.”
त्यानंतर ईशा मातृत्वाच्या प्रवासाविषयी म्हणाली, “आई नीता अंबानींनी स्थापन केलेल्या ‘NMACC’ मध्ये बहुतांश महिला काम करतात. हे सेंटर सुरू होण्याच्या सुमारास मी मुलांना जन्म दिला होता.”
हेही वाचा – Video: सुहाना खान कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदाबरोबर दिसली नाइटक्लबमध्ये पार्टी करताना, व्हिडीओ झाला व्हायरल
पुढे पती आनंद पिरामलचा उल्लेख करत व त्याचे आभार मानत ईशा अंबानी म्हणाली, “गर्भधारणेदरम्यान आईला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण स्तनपानासारख्या काही गोष्टी फक्त तीच करू शकते. पण पालकत्वाच्या बाबतीत इतरही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पती-पत्नी दोघेही मिळून करून शकतात आणि त्या करायलाच पाहिजे. मी आनंदची खूप आभारी आहे. कारण तो मुलांचं बरंच काही करतो. मग डायपर बदलणं असो किंवा जेवण भरवणं असो तो सगळं करतो. जेव्हा मला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं किंवा कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं तेव्हा तो मुलांच्याबरोबरच असतो. जेणेकरून मला वाईट वाटू नये.”