अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर सध्या अंबानींची लाडकी लेक ईशा तिच्या लॉस एंजेलिसमधील आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी व तिचा पती आनंद पिरामल यांचा अमेरिकेतील बंगला हॉलीवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांनी ५०० कोटींना विकत घेतल्याचं समोर आलं आहे. जेनिफर आणि बेन यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये ईशाबरोबर घरासाठी करार केला होता.
लॉस एंजेलिसच्या बेव्हरली हिल्सच्या अगदी मध्यभागी असलेला हा आलिशान बंगला तब्बल ३८ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरला आहे. यात १२ बेडरुम, २४ बाथरुम, एक इनडोअर पिकलबॉल कोर्ट, जिम, सलोन, स्पा, १५५ फूट लांबीचा इनफिनिटी स्विमिंग पूल, स्वयंपाकघर आणि या बंगल्याबाहेर सुंदर असं हिरवंगार गार्डन आहे.
हेही वाचा : नम्रता संभेराव अन् मुक्ता बर्वेची अनोखी जुगलबंदी! ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, छोट्या मायराने वेधलं लक्ष
लॉस एंजेलिसमधील या आलिशान आणि भव्य घरासाठी अमेरिकन गायिकेने गेल्यावर्षी जून महिन्यात ईशाबरोबर करार केला होता. जेनिफर आणि बेन या जोडप्याने $६१ मिलियन म्हणजेच भारतीय रुपयानुसार जवळपास ५०० कोटींहून अधिक किंमतीत हा बंगला खरेदी केल्याचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलं आहे.
हेही वाचा : “स्वत:ला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे…”, प्रथमेश लघाटेचं नेटकऱ्याला उत्तर; म्हणाला, “माझी भाषा…”
जेनिफर लोपेझने २०२२ मध्ये बेन ऍफ्लेकबरोबर चौथं लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या तिची एकूण संपती ३ हजार ३३२ कोटींच्या घरात आहे. या अमेरिकन गायिकेचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.
दरम्यान, ईशा अंबानी गरोदर असताना लॉस एंजेलिसमधील या LA Mansion घरात वास्तव्याला होती. तसेच जानेवारी २०२३ मध्ये तिने हे घर प्रियांका चोप्राला देखील एका स्पेशल स्क्रिनिंगच्या कार्यक्रमासाठी दिलं होतं. ‘छेलो शो’ या गुजराती शोचं स्किनिंग याठिकाणी करण्यात आलं होतं.