जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी ईशादेखील नेहमीच चर्चेचा विषय असते. २०१८ साली इशाने प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तर गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला.
ईशा अंबानी एक फॅशन आयकॉन आहे आणि ती तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचं भरपूर फॅन फॉलॉईंग आहे. ती कोणते कपडे परिधान करते किंवा तिने परिधान केलेल्या कपड्यांची आणि चपलांची किंमत काय, याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात फारच उत्सुकता असते. आता तिने तिचे पती आनंद पिरामल यांच्याबरोबर डिनर डेटवर जाताना घातलेल्या चपलांची किंमत समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच ईशा तिचे पती आनंद पिरामल यांच्याबरोबर बांद्रा येथील अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये डिनर डेटला गेली होती. या दरम्यानचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या डेटवर जाताना तिने परिधान केलेल्या नाईट ड्रेस सारख्या दिसणाऱ्या कपड्यांमुळे तिला अनेकांनी ट्रोलही केलं गेलं. पण तिच्या कपड्यांबरोबरच तिने घातलेल्या चपलांनी सर्वांचं लक्ष वेधलं. त्या डेटवर जाताना तिने घातलेल्या चपलांची किंमत तब्बल ५४ हजार आहे. एका जगप्रसिद्ध ब्रँडच्या या चपला आहेत.
हेही वाचा : ईशा अंबानीने परिधान केलेल्या या सिंपल ड्रेसची किंमत तब्बल…; आकडा वाचून व्हाल थक्क
आता तिच्या या लूकमधील फोटो खूप व्हायरल होत असून यावर कमेंट्स करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. या साध्या दिसणाऱ्या चपलांची किंमत कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.