Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांची १२ जुलैला लग्नागाठ बांधली जाणार आहे. दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवस बाकी असून सध्या लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ आणि गरबा नाईटनंतर काल, ५ जुलैला अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते. लहान भावाच्या संगीत सोहळ्यात ईशा अंबानीने खास डिसाइन केलेली सुंदर साडी नेसली होती. या साडीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे अनंत-राधिकाचा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संगीत सोहळ्याला अभिनेता सलमान खान, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, दिशा पटानी, पूजा हेडगे, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख असे अनेक बॉलीवूडचे कलाकार सुंदर, स्टायलिश कपड्यांमध्ये उपस्थित राहिले होते. ईशा अंबानीने देखील स्टायलिश निळ्या रंगाची साडी नेसली होती. ही निळ्या रंगाची साडी भारतात नव्हे तर विदेशातल्या प्रसिद्ध ब्रँडकडून खास तयार करण्यात आली आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल

हेही वाचा – Video: ८३ कोटींचं मानधन घेणाऱ्या जस्टिन बीबरच्या गाण्यांवर थिरकले अंबानींचे पाहुणे, पाहा जगप्रसिद्ध पॉपस्टारचा परफॉर्मन्स

ईशा अंबानीने संगीत सोहळ्यात नेसलेली ही निळ्या रंगाची साडी इटलीचा प्रसिद्ध ब्रँड Schiaparelli डिझाइन केली आहे. या ब्रँडची ही पहिली कस्टम मेड साडी आहे. ईशाच्या निळ्या साडीचं ब्लाउज फारच हटके आहे. सिक्विन असलेलं हे सिल्व्हर कलरचं ब्लाउज आहे. या सुंदर अशा पेहरावर ईशाने हिऱ्याचा नेकलेस, कानतले आणि मोठ्या हिऱ्याचा मांगटिक घातला होता. ईशाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमान खानच्या गाण्यावर रणवीर सिंहचा एनर्जेटिक डान्स, तर कपूर भावंडं थिरकली ‘या’ गाण्यावर

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader