हिंदी चित्रपटसृष्टीनंतर मराठमोळी ईषा कोपीकर आता मराठी चित्रपटांकडे वळली आहे. ‘मात’ या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट आपल्या करियरला कलाटणी देणारा आहे याची जाणीव झाल्यानेच बॉलीवूडमध्ये रमलेल्या ईषा कोपीकरने मराठीकडे वळण्याचा निर्णय घेतला. ‘मात’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या निर्णयाबाबत अत्यंत समाधानी आहे. साईली ड्रीम व्हेंचर्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोहर सरवणकरचे असून, सलिल कुलकर्णीने संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात ईषा कोपीकर, समीर धर्माधिकारी, आणि उंच माझा झोका या मालिकेने सर्वांच्या मनात घर करणारी छोटी रमा म्हणजेच तेजश्री वालावलकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मात ही मिनी नावाच्या असामान्य मुलीची भावस्पर्शी कथा आहे. अजय (समीर धर्माधिकारी) आणि रीमा (ईषा कोपीकर) या दाम्पत्याची मिनी ही मुलगी. मिनीची एन्ट्री होताच दोघांच्याही आनंदाला पारावार उरत नाही. दोघेही आपापल्या परीने मिनीचं करियर घडवण्यासाठी स्वप्न पाहू लागतात. मिनीसाठी पाहिलेल्या या स्वप्नांचा चढता-उतरता आलेख वैविध्यपूर्ण घटनांच्या माध्यमातून चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. समोर आलेल्या आव्हानांवर ‘मात’ करत विजय मिळवण्यासाठी मिनीची प्रवृत्ती सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा