‘दिल दोस्त इटिसी’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक मनीष तिवारी शेक्सपियरच्या ‘रोमिओ आणि ज्युलियट’ नाटकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे.
बनारसमध्ये घडलेल्या या प्रेमकथेत बॉलिवूडचा मसाला ठासून भरला आहे. या चित्रपटाद्वारे क्लासिक लव्हस्टोरीला एका नव्या स्वरूपात दाखविले जाणार आहे. मनिष म्हणाला, ‘दिल दोस्ती इटिसी’ चित्रपटानंतर मला बॉलिवूड मसाला चित्रपट बनवण्याची इच्छा होती. शेक्सपियरच्या ‘रोमिओ आणि ज्युलियट’ या नाटकावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा चित्रपट वेगळ्या ढंगाने बनवण्याचे मी ठरवले होते. चित्रपटात काही गोष्टी मी नवीन स्वरूपात दाखवल्या आहेत.
या आधीचे ‘एक दुजे के लिए’, ‘इशकजादे’ आणि अलीकडे प्रदर्शित झालेला ‘रांझणा’ या  दु:खद प्रेमकथा असलेल्या चित्रपटांपेक्षा आपला  चित्रपट वेगळा असल्याची मनीषला खात्री आहे.
मनीष म्हणाला, अशा प्रकारच्या कथा नेहमीच चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आल्या आहेत. फरक फक्त एवढ्याच गोष्टीचा असतो की, वर्तमान परिस्थितीचे संदर्भ देत तुम्ही त्याला कशाप्रकारे तो प्रदर्शित करता.
बनारसची सुंदर पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रतीक बब्बर आणि नवोदित अभिनेत्री अमैरा दस्तूर मुख्य भूमिकेत असून, चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader