भूतसिनेमांचे किंवा भीतीपटांचे गेल्या काही वर्षांत ठराविक फॉर्म्यूले ठरले आहेत. पारंपरिक भीतीपट असेल, तर तरुण-तरुणींचा गट निर्जन ठिकाणी मज्जा करण्यासाठी एकत्र आल्यानंतर तेथील अतृप्त अ-मानवी शक्ती त्यांना एकेक करून संपविण्याचा प्रकार घडविला जातो. एकूणएक व्यक्तींचा खात्मा होईस्तोवर हा भूतधिंगाणा ओंगळवाण्या चेहऱ्याचे आणि कारवायांचे दर्शन घडवितो. आधुनिक भीतीपट असेल, तर तो सीसीटीव्ही फूटेजमध्ये चित्रित झालेल्या गोष्टींना एकत्र करून भयप्रश्न निर्माण करतो. अंगावर काटा आणण्याची मात्रा दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टींमध्येच अधिक असल्याने या आधुनिक भयपटांमध्ये भयशक्यता अधिक असते. तरीही गेल्या दोन दशकांमध्ये असे रिअॅलिटी फूटेज भय सिनेमा सातत्याने पाहणाऱ्यांना यातील गोम कळाली आहे. आणखी एका फॉर्म्यूल्यानुसार जगबुडी किंवा जग नष्टीकरणाच्या अवस्थेत लोक झॉम्बी बनून एकमेकांचे रक्त ओरपतात. झॉम्बीसंसर्गापासून बचावलेली चार-दोन माणसे मग बचावासाठी निरनिराळ्या तऱ्हेचे कार्यक्रम आखतात आणि त्यांच्या जीवनलढय़ाचे टप्पे हे भीती निर्माण करण्यासाठी वापरले जातात. ‘इट कम्स अॅट नाइन’ यातील शेवटच्या फॉर्म्यूल्याचा वापर करतो की काय, असे वाटत असतानाच चांगला भयधक्का देतो. सुरुवातीपासून राखलेल्या भय, संशय आणि अविश्वाच्या संसर्गाचा इथला मारा परिणामकारक आहे. इतर भूत-थरार सिनेमांसारखा इथे सतत घाबरविण्यासाठी मुद्दाम आणलेला आवाजी प्रकार नाही किंवा हिणकस दृश्यांची बरसात नाही. अंगावर काटा निर्माण करणाऱ्या निवडक दृश्यांतून तो मनातल्या भीतीकेंद्राला जागृत करण्याची क्षमता राखून आहे.
ना-भीतीपट!
भूतसिनेमांचे किंवा भीतीपटांचे गेल्या काही वर्षांत ठराविक फॉर्म्यूले ठरले आहेत.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2017 at 02:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It comes at night movie review