अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिने बुधवारी सकाळी बाळाला जन्म दिला. सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी शेअर केली आहे. मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात अर्पिताने बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. दरम्यान, बाळाचे नाव ‘अहिल’ ठेवण्यात आल्याचेही आयुषने सांगितले. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अरबाज यांच्यातील दुराव्यामुळे खान कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अर्पिताचे ‘बेबी शॉवर’
सलमान झाला मामा; अर्पिता खानला पुत्ररत्न
नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 30-03-2016 at 13:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its a baby boy for salman khan sister arpita khan