‘सिम्बा’ या चित्रपटाच्या यशासोबतच दिग्दर्शक रोहित शेट्टीने बॉक्स ऑफीसवर एक आगळावेगळा विक्रम केला. बॉक्स ऑफीसवर १०० कोटींची कमाई करणारे सलग आठ चित्रपट रोहितच्या नावावर आहेत. ‘सिम्बा’नंतर आता प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा आगामी चित्रपट बॉलिवूडच्या खिलाडी कुमार अर्थात अक्षयसोबत असणार आहे. ‘सूर्यवंशी’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार असल्याची चर्चा होती. पण आता या चर्चांवर रोहितने स्पष्टीकरण दिले आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षयसोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार हे अद्याप ठरलंच नाही, असा खुलासा रोहितने केला आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेवरच काम सुरू असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे अक्षय-कतरिना जोडीला पडद्यावर पाहण्याची चाहत्यांशी इच्छा सध्या तरी पूर्ण होणार नाही असंच चित्र दिसतंय.

Photo : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब?

‘हमको दिवाना कर गए’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’, ‘तीस मार खान’ यांसारख्या चित्रपटात अक्षय-कतरिनाने एकत्र काम केलं होतं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यामुळे ‘तीस मार खान’नंतर नऊ वर्षांनी ही जोडी पडद्यावर एकत्र झळकणार असल्याची चर्चा झाल्यावर चाहत्यांनाही उत्सुकता होती. पण कदाचित चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Story img Loader