बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ ही त्यांच्या मस्तमलंग स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, यावेळी जॅकी यांनी मुलगा टायगर श्रॉफला त्याच्या लूक्सवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सला फटकारले आहे. गेल्या काही वर्षांपासून टायगरला त्याच्या लूक्सवरून अनेकांनी ट्रोल केले आहे. काही ट्रोल्सनी तर त्याची तुलना करीना कपूरशी केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी टायगरला त्याच्या लूक्सवरून ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी टायगर आणि करीनाचे लूक्स सारखे आहेत म्हणणाऱ्यांना फटकराले आहे. ‘तो तरुण आहे. तो अजूनही मोठा होत आहे. तो अजुनही देवाचा एक लहाण मुलगा आहे. मला आनंद आहे की प्रेक्षक त्याच्याकडून जी अपेक्षा करत आहेत तसा तो दिसत नाही. याचा अर्थ जैकी का बच्चा है तो दाढ़ी के साथ ही पैदा होगा क्या?’, असे जॅकी म्हणाले.

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

पुढे करीनाशी होणाऱ्या तुलणेवर जॅकी म्हणाले, ‘करीनाशी तुलना केली जात आहे! आणि तुम्ही त्या तुलनेवर मीम्स असतात त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते ते तुम्ही पाहायला हवी. त्याच्यावर याचा परिणाम होत नाही. त्याला काय करायचं आहे हे त्याला माहित आहे. तो जेव्हा पडद्यावर अॅक्शन करतो किंवा डान्स करतो तेव्हा तो टायगर दिसतो. एखाद्या माणसाला अॅक्शन येते तर त्याला डान्स करणे कठीण होते. पण तो दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करतो.’

आणखी वाचा : ‘तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे की…’, बोल्ड ड्रेसने फजिती केल्यानंतर नोरा फतेही झाली ट्रोल

टायगरने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या लूकमुळे टायगरची तुलना करीनाशी करण्यात आली होती. दरम्यान, टायगर लवकरच ‘हीरोपंती २’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackie shroff has slammed trolls criticising tiger shroff looks dcp