अभिनेत्री दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी आपलं नातं खुलेपणानं मान्य केलं नसलं तरी अनेक ठिकाणी ही जोडी दिसते. या नात्याबद्दल जॅफी श्रॉफ यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं. ज्यामध्ये त्यांनी दिशा आणि टायगरच्या नात्याचे अनेक पैलू उलगडले.

‘टायगरच्या आयुष्यात तिच्या रुपानं एक चांगली मैत्रीण आली आहे. डान्स आणि व्यायाम ही दोघांचीही आवड आहे. दोघंही एकत्र ही आवड जोपासतात. तिचे वडील सैन्यात होते त्यामुळे शिस्तीचं महत्त्व ती जाणते. ते दोघंही भविष्यात लग्न करतील किंवा आयुष्यभर ऐकमेकांचे घट्ट मित्रही होतील. त्यांच्या नात्याबद्दल आता काहीच सांगता येत नाही’ असं जॅकी श्रॉफ म्हणाले.

टायगर आणि दिशा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘बागी २’ मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. टायगर आणि दिशा दोघंही सार्वजनिक ठिकाणी एकत्र वावरताना दिसतात. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची उघडपणे कबुली अद्याप दिलेली नाही.

Story img Loader