काही दिवसांपूर्वी जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते. तिच्या त्या बोल्ड फोटोंनी सोशल मिडीयावर तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याविषयी जॅकी श्रॉफला विचारले असता तो म्हणाला की, मला माझ्या मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला आवडत नाही. माझ्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार मिळाले आहेत. काय करावे आणि करू नये हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. स्वतःबद्लच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ते समर्थ आहेत. मला त्यांच्याबद्दल बोलायला नाही आवडत कारण ते जे काही करतात त्याच्याशी मी सहमत असतो. कृष्णाच्या टॉपलेस फोटोबद्दल बोलताना तो म्हणाला की, तुम्ही त्या फोटोंमध्ये कृष्णा टॉपलेस आहे असे कसे म्हणू शकता. त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो, असे म्हणत जॅकीने आपल्या मुलीची बाजू घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा