बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जॅकी श्रॉफ बऱ्याचवेळा त्यांच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी सांगून जातात. त्याचप्रमाणे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोक भविष्यवाणीवर कसे हसतात यावर वक्तव्य केलं. त्यासोबतच त्यांच्या ज्योतिषी वडिलांनी जॅकी यांच्या लहान भावा विषयी केलेल्या एका भविष्यवाणी विषयी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॅकी यांनी नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या ट्विक इंडिया या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघांनी अनेक गप्पा मारल्या. तेव्हाच जॅकी यांनी त्यांच्या वडिलांनी केलेल्या भविष्यवाणी विषयी सांगितले. “त्यांनी भावाला सांगितलं होतं, की आजचा दिवस चांगला नाही, बाहेर जाऊ नकोस. माझा भाऊ सेंच्युरी मिलमध्ये काम करायचा. तेव्हा वडील म्हणाले की आज मीलमध्ये जाऊस नको. तर भाऊ गेला नाही. पण, स्वत:ला पोहोयचं कसं हे माहित नसताना तो समुद्रात बुडणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तो गेला आणि स्वत: बुडाला”, असे जॅकी म्हणाले.

आणखी वाचा : गीता माच्या आयुष्यात खास व्यक्तीची एण्ट्री, जाणून घ्या या मिस्ट्री बॉयबद्दल

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

पुढे जॅकी म्हणाले, “जेव्हा ते म्हणाले आजचा दिवस वाईट आहे, तेव्हा माझ्या भावाचे निधन झाले. ते मला म्हणाले होते की तू अभिनेता होणार आणि मी अभिनेता झालो. त्यांचे नटूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांच्यासोबत चांगले संबंध होते. ते कोकिलाबेन यांना म्हणाले होते की तुझा नवरा एक दिवस खूप मोठा माणूस होणार. त्यावर धीरूभाई म्हणायचे ‘हा वेडा झाला आहे’.” दरम्यान, जॅकी नेटफ्लिक्सवरील ‘कॉल माय एजंट’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackie shroff says astrologer dad predicted something bad would happen the day his brother drowned dcp