बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ कोणत्या ना कोणच्या कारणामुळे सतत चर्चेत असते. जॅकी श्रॉफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णाच्या रिलेशनशिप सांगितले. एवढंच नाही तर त्यांच्या मुलीसाठी मुलगा शोधणे खूप कठीण असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा आणि जॅकी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जॅकी यांच्या या वक्तव्यावर कृष्णाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. “मला नाही वाटत की मी ज्यापण लोकांसोबत राहिली, त्या पैकी कोणी माझ्या वडिलांना आवडत असेल. यासाठी खरतरं मी त्यांनी दोषी ठरवमणार नाही. ते बरोबर आहेत,” असे कृष्णा म्हणाली.

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

तर या विषयी जॅकी म्हणाले, “ज्याच्यावर ती प्रेम करते मी त्याचा आदर करतो. तिला या प्रवासातून जाण्याची गरज आहे, पण एक वडील असल्याच्या नात्याने तिच्यासाठी एक योग्य मुलगा शोधणे कठीण आहे,” असे जॅकी यांनी सांगितले.

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

‘ते एक प्रोटेक्टिव वडील आहेत का आणि मुलगी निघून जाण्याची भीती त्यांना वाटते का?’ असा प्रश्न विचारता जॅकी म्हणाले, “मी तसा नाही. ही तिच्या मनाची इच्छा आहे. शेवटी तिला त्या व्यक्तीबरोबर आयुष्य व्यतीत करावे लागेल, त्याच्यासोबत रहावे लागेल. आपले आई-वडील नेहमीच आपल्यासोबत नसतात. त्यांना अशा व्यक्तीला शोधावे लागेल जे त्यांच्यावर प्रेम करतील आणि त्यांची काळजी घेतील. त्यामुळे मी म्हणतो की माझ्या राणी म्हणजेच कृष्णासाठी एक चांगला मुलगा शोधणे कठीण आहे.”

जॅकी श्रॉफ यांना दोन मुलं आहेत. कृष्णा आणि टायगर हे दोघे ही फिटनेस फ्रिक आहेत. कृष्णा आणि टायगर दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते दोघे सोशल मीडियावर त्यांच्या फीटनेसचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. कृष्णाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackie shroff says it is tough to find someone for daughter krishna dcp