आजमितीला महाराष्ट्रात गजानन महाराजांचे असंख्य भक्तगण आहेत. या भक्तगणांसाठी निर्माते दीपक गोरे व दिग्दर्शक पितांबर काळे ‘शेगावीचा योगी गजानन’ हा भक्तीमय चित्रपट घेऊन येत आहेत.
गजानन महाराजांच्या माहात्म्यावर आधारलेल्या या चित्रपटातील एका कव्वालीचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यात प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने एका कव्वालीवर ठेका धरला. ‘तू ही ताज तू ही साई’ असे बोल असलेल्या कव्वालीवर जॅकी श्रॉफ तल्लीन होऊन नाचला. या कव्वालीचं नृत्यदिग्दर्शन भूपी दास यांनी केलं आहे. बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात चक्क एका कव्वालीवर सादरीकरण करायला मिळाल्याचा आनंद यावेळी जॅकी श्रॉफने व्यक्त केला.
प्रवीण दवणेने लिहिलेल्या या कव्वालीला संगीतकार नंदू होनपचं संगीत लाभलं आहे. गजानन महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेल्या या चित्रपटातून जीवनाचा सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, संजय खापरे, भारत गणेशपुरे, दिपाली सय्यद, प्रेमा किरण, पूनम विणेकर यांच्या लक्षवेधी भूमिका या चित्रपटात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा