बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर ते अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते भावुक झाले आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर इमोशनल कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ आपल्या आयुष्याबाबत बोलताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ म्हणतात, ‘माझे आई-बाबा आणि भाऊ तिघंही हे जग सोडून गेले. जसे हे सर्वजण गेले ना तसं आपणही एक दिवस सर्वांना सोडून जाणार. पण आपण ते दुःख घेऊन फिरायचं नाही. तीन व्यक्ती गेल्या आणि तीन व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या. टायगर, कृष्णा, माझी पत्नी माझ्या आयुष्यात आले पण माझी आई, बाबा आणि माझा भाऊ मला सोडून गेले. पण हे सर्व बॅलन्स झालं. उद्या कधी मी देखील निघून जाईन आणि नवीन कोणीतरी येईल. हे सर्व होत राहणार आहे.’

जॅकी श्रॉफ पुढे म्हणतात, ‘तुम्ही जर तुमचं दुःख घेऊन बसलात तर तुमचा काहीच फायदा होणार नाही. डोळे उघडून पाहाल तर जगात बरेच लोक तुमच्यापेक्षा दुःखी आहेत. त्या सर्वांच्या समोर तुमचं दुःख काहीच नाही हे तुम्हाला समजेल. चांगले दिवस निघून जातात. हे कोणीच लक्षात ठेवत नाही.’ जॅकी श्रॉफ यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर त्यांचे चाहते भावुक कमेंट करताना दिसत आहेत.