बॉलिवूडचा भिडू म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ ओळखले जातात. जॅकी श्रॉफ त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये क्वचितच कधी कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सी मध्ये अडकले आहेत. मात्र, सगळ्यांच्या लक्षात असलेली एक कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे २०११ मध्ये जॅकी श्रॉफ हे समलैंगिक आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

हा वाद खरतंर तेव्हा सुरू झाला जेव्हा एका पाकिस्तानी वेबसाईटने हा दावा केला की जॅकी श्रॉफ यांनी ते समलैंगिक असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर ही गोष्ट ट्विटवर प्रचंड व्हायरल झाली होती. वेबसाइटने दावा केला की जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या पत्रकाराला सांगितले की ते समलैंगिक आहेत.

‘आयएएनएस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकी श्रॉफ यांनी सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. “तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? बस आता फक्त हेच बाकी राहिलं होतं. लोकांना काही कामं नाही. फक्त हेच सगळं आहे…तुमच्या माहितीसाठी मी या विषयी कोणत्याही पत्रकाराशी कधी बोललो नाही आणि मी अशी कोणतीही घोषणा केली नाही. मी मूर्ख आहे का?,” असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

जॅकी पुढे म्हणाले, ” काहीही असो पण एखाद्याच्या लैगिंकतेविषयी इतकी चर्चा का व्हावी? कोणी समलिंगी आहे, तर ती व्यक्ती समलिंगी आहे. मी असतो तर ते स्वीकारण्यात मला काही वाटले नसते. पण मी समलिंगीक नक्कीच नाही. आणि ज्या पत्रकाराने हे सगळं सांगितलं त्याच्या धैर्याने मी आश्चर्यचकित आहे.”

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

एवढंच नाही तर जेव्हा ही अफवा जॅकी आणि त्यांची पत्नी आयशा श्रॉफ यांनी ऐकली त्यावेळी त्या दोघांची प्रतिक्रिया काय होती या बद्दल देखील त्यांनी सांगितले आहेत. ते म्हणाले, “मी माझ्या पत्नीकडे पाहिले आणि तिने माझ्याकडे पाहिले त्यानंतर आम्ही दोघेही खूप हसलो..”

आणखी वाचा : त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता

सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटात जॅकी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात ते अक्षय कुमारसोबत दिसतील. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतही ते एका चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader