krishna-shroffअभिनेता जॅकी श्रॉफचा मोठा मुलगा टायगर श्रॉफने याआधीच बॉलिवूडमध्ये आगमन केले असून, त्याची मुलगी कृष्णाने तृतीयपंथियांच्या जीवनावर आधारीत एका वृत्तपटाची निर्मिती करीत कॅमेऱ्याच्या मागे राहाणे पसंत केले. या वृत्तपटासाठीचे चित्रीकरण तिने स्वत: केले आहे. मुलीच्या या कामाचा श्रॉफ कुटुंबाकडून कोणताही गवगवा करण्यात आला नाहीये. कृष्णा अतिशय हुशार असून, ती शैक्षणिक अथवा फाईन आर्टसारख्या कुठल्याही क्षेत्रात चमकली असल्याचे सांगत श्रॉफ कुटुंबियांच्या निकटवर्तीयाने तिचे कौतुक केले. तिने साकारलेला ‘ब्लॅक शिप’ नावाचा वृत्तपट तृतीयपंथियांच्या जीवनावर निःपक्षपाती कटाक्ष टाकतो. आपल्या लेकीविषयी बोलताना आयेशा म्हणाली, मुंबईतील तृतीयपंथियांच्या जीवनावरील वृत्तपटाचे चित्रीकरण आमची मुलगी कृष्णाने नुकतेच पूर्ण केले. आत्तापर्यंतच्या अनेक वृत्तपटांमधून अथवा चर्चांमधून तृतीयपंथियांची विदारक आणि खिन्न जीवनशैली दर्शविली गेली आहे. परंतु, कृष्णाने खऱ्या अर्थाने वेगळा वृत्तपट साकारला असून, तो तृतीयपंथियांच्या जीवनातील आनंद, आशा-आकांक्षा आणि त्यांच्या स्वप्नांवर प्रकाश टाकत असल्याचे मनोगत कृष्णाच्या आईने व्यक्त केले. हा वृत्तपट कृष्णाने स्वत:हून साकारल्याचा सार्थ अभिमान आयेशाला वाटत असून, मुलांची प्रगती पाहून आई आयेशा आणि वडील जॅकी श्रॉफ समाधानी आहेत.

Story img Loader