बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी ईडीने जॅकलीनची ७ तास चौकशी केली. तर शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

सुकेशचे वकील म्हणाले की नोरा फतेही आणि जॅकलीनला फायदा झाला आहे आणि त्या स्वत:ला पीडित असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले असून, ‘जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले आहे. तिने तिचे म्हणणे नोंदवण्यात आले आहे आणि भविष्यातही तपासात एजन्सीला पूर्ण सहकार्य करेल.’

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

यावेळी सुकेश आणि त्याच्या पत्नीसोबतच्या संबंधांबद्दल केलेल्या कथित निंदनीय विधानांचे जॅकलिनने खंडन केले. सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉलसोबत तिचे कोणतेही संबंध नाहीत आणि कोणाला डेट करत नसल्याचे जॅकलिनने स्पष्ट केले. या प्रकरणात नोरा फतेहीचेही नाव आले, त्यानंतर ईडीने तिचीही चौकशी केली.

Story img Loader