बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आहे. ईडीच्या या कारवाईनंतर पहिल्यांदाच जॅकलिनने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. या कठीण काळात आपण खंबीर होत आहोत असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जॅकलिन फर्नांडिसचं नाव लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिचे नाव जोडलं गेल्याने जॅकलिन फर्नांडिस आयकर विभागाच्या रडारवर होती. बुधवारी तिच्यावर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी तिला आरोपी ठरवण्यात आलंय. अर्थात जॅकलिनने यावर कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही मात्र तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.
आणखी वाचा- जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडी दाखल करणार आरोपपत्र

जॅकलिन फर्नांडिसने Sheroxworld नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरील पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, “मी शक्तिशाली आहे. मी जशी आहे तसंच स्वतःला स्वीकारलं आहे. सर्व काही ठीक होईल. मी खंबीर आहे, मी एक दिवस माझं लक्ष्य गाठणार आहे आणि स्वप्न पूर्ण करणार आहे.” दरम्यान मनी लँड्रिंग प्रकरणात ३७ वर्षीय जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा कसून चौकशी करण्यात आली आहे.
आणखी वाचा-अनिता हसनंदानी पुन्हा होणार आई? अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहतेही गोंधळले

आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader