बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचे भवितव्य हे दर आठवडय़ाला शुक्रवारी झळकणाऱ्या नव्या चित्रपटासोबत कित्येकांचे आयुष्य घडते किंवा बिघडते. या तराजूच्या पारडय़ामध्ये हेलकावे खात असताना जॅकलिनची भेट सलमान खानसोबत झाली आणि ‘किक’सारखा हमखास यशाचा फॉम्र्युला असलेला चित्रपट तिच्या पारडय़ामध्ये पडला. त्यानंतर या ‘श्रीलंकन ब्युटी’ने मागे वळून पाहिलेच नाही. लवकरच ती ‘रॉय’ या चित्रपटामधून दोन परस्परविरोधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यानिमित्ताने बोलताना एकीकडे ‘किक’ चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला मिळालेले नवे वळण आणि ‘रॉय’च्यानिमित्ताने एकाच चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या दोन महत्त्वाच्या नायकांची नायिका साकारायचे आव्हान पेलल्याचा आनंद सध्या तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो.

‘रॉय’ प्रदर्शनाला येऊन ठेपला असला, तरी ‘किक’च्या ‘हँगओव्हर’मधून अजूनही जॅकलिन बाहेर आलेली नाही. ते सहाजिकच आहे म्हणा ना..या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाल्याचे ती स्वत: मान्य करते. पण त्यानंतर पुन्हा एकदा मसालापट न स्वीकारता ‘रॉय’सारख्या एका वेगळ्या विषयाचा चित्रपटाची निवड करत अभिनयकौशल्य दाखवण्याची संधीही तिने पदरात पाडून घेतली.
या चित्रपटामध्ये आयेशा नावाची नवोदित चंचल दिग्दर्शिका आणि गंभीर, संयमी विचाराची कलाप्रेमी टिया अशा दोन भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आहे. स्वत: गप्पिष्ट असलेल्या जॅकलिनला चित्रपटामध्ये टियाची भूमिका साकारणे जास्त कठीण गेल्याचे ती सांगते. या चित्रपटाने तिला अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर या दोन ताकदीच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
एकीकडे स्क्रिप्ट हातात पडल्यावर त्यात गुंतून जाणारा अर्जुन तर दुसरीकडे सेटवर शांत असलेला पण कॅमेरामोर जाताच व्यक्तीरेखेमध्ये आत्मा ओतणारा रणबीर दोघंही कामाच्या बाबतीत एकमेकांपेक्षा पुर्णपणे भिन्न असल्याचे ती सांगते. जॅकलिनसाठी हा चित्रपट खुप महत्त्वाचा होता. त्यामुळे या भूमिकेच्या लूकपासून ते दोन्ही व्यक्तीरेखांमधील
बारकावे टिपण्यापर्यंत कोणत्याही बाबतीत तिने कसूर ठेवली नाही. सेटवर ती अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टींवर जातीने लक्ष देत होती. अर्थात
ाता तिची ही मेहनत किती सार्थकी लागणार आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
याशिवाय तिने ‘डेफिनेशन ऑफ फियर’, ‘अकॉडिंग टू मॅथ्यू’ या दोन्ही आतंराष्ट्रिय चित्रपटांचे चित्रीकरण संपविले आहे. त्यासोबतच रितेश देशमुखसोबत ‘बँगिस्तान’, करण मल्होत्राचा ‘ब्रदर्स’ असे अनेक चित्रपट तिच्या हातात आहेत. त्यामुळे ‘किक’च्या ‘हँगओव्हर’नंतर आता तिच्यावर यशाचा ‘हँगओव्हर’ चढणार हे नक्की..

Story img Loader