बॉलीवूड दबंग खान सलमानसोबतच्या ‘किक’ चित्रपटातील भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुपरस्टार आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे.
‘मि. परफेक्टशनिस्ट’ आमिर खानच्या ‘पीके’ने तिकीटबारीवर नवा विक्रम गाठला आहे. पीके चित्रपटातील भूमिकेवरून सध्या आमिरवर सर्वत्रत स्तुतीसुमने उधळली जात आहेत. मुंबईत अशाच एका कार्यक्रमात अभिनेत्री जॅकलिनला आमिरसोबत काम करणार का? असे विचारले असता मला जितक्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळेल तितके माझ्या दृष्टीने चांगलेच आहे. कारण, एक अभिनेत्री म्हणून माझी प्रगती होण्यासाठी याची मला मदतच होईल. आणि हो, आमिरसोबत काम करण्याची संधी मिळावी अशी जवळपास प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. तशी माझीही आहे. कारण, आमिरच्या सर्व चित्रपटांच्या कथेचा गाभा नेहमी उत्कृष्ट आणि संदेश देणारा असतो. एक परफेक्टशनिस्ट अभिनेता म्हणून आमिरची ओळख आहे. आमिर एक उल्लेखनीय कलाकार आहे, असेही जॅकलिन पुढे म्हणाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा