jacqueline-performance-759बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या शानदार अदाकारीने २१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्याची सुरूवात झाली. एखाद्या राजकुमारीप्रमाणे जॅकलिनचे सजलेल्या पालखीतून स्टेजवर आगमन झाले आणि ‘किक’ चित्रपटातील गाण्यावर तिने ठेका धरला. त्यानंतर आपला आगामी ‘रॉय’ चित्रपटातील नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘चिट्टीया कलाईंया’ गाण्यावर जॅकलिनने नृत्य सादर केले. ‘किक’मधील बहुचर्चित ‘जुम्मे की रात गाणे’ झाल्याशिवाय जॅकलिनची अदाकारी पूर्ण कशी होईल? अखेरीस जॅकलिन ‘जुम्मे की रात’ गाण्यावर थिरकताना दिसली. या गाण्यावर जॅकलिनचे नृत्य सुरू होताच प्रेक्षकांकडून शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडला. 

Story img Loader