बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर ‘किक’ चित्रपटात काम केल्यापासून श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिसचे भाग्य खुलले असून, सध्या तिच्याकडे काही चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘रॉय’ चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणारी जॅकलिन माजी क्रिकेटपटू मोहंम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटात अझरुद्दीनची बायको संगीता बिजलानीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेत्री करिना कपूरशी संपर्क साधण्यात आल्याचेदेखील बोलले जाते. परंतु, या चित्रपटाऐवजी करिनाने ‘उडता पंजाब’ चित्रपट स्वीकारणे पसंत केले. ११९६ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या अझर आणि संगीताचा २०१० साली घटस्फोट झाला.

Story img Loader