सलमान खानच्या ‘किक’ या आगामी चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. जॅकलीन म्हणाली, सलमानसारख्या मोठ्या बॉलिवूड स्टारबरोबर काम करायची संधी मिळणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखे आहे. श्रीलंकन सुंदरी जॅकलीनचा ‘ रेस-२’ हा चित्रपट या वर्षी सिनेमागृहात झळकला होता. ‘किक’ अॅक्शनपटामध्ये ती सलमानबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. साजिद नाडियादवाला  या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलतांना जॅकलीन म्हणाली , सलमान खान हा बॉलिवूडमधला फार मोठा स्टार असून, त्याच्याबरोबर काम करायला मिळणे माझ्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखे आहे.
‘कीक’ हा चित्रपट २००९ साली आलेल्या याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे चित्रिकरण जुलै महिन्यात सुरू होणार असून, चित्रपट  पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे. साजिद खानचा मागच्या वर्षी आलेला ‘हाऊसफूल-२’ या चित्रपटातही जॅकलीनने काम केले होते.

Story img Loader