चीनमधून फैलावलेल्या करोना विषाणूने जगभरात हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत या विषाणूची जगभरातील हजारो लोकांना लागण झाली असून काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळेच सध्या जगभरात भीतीचं वातावरण आहे. अशातच करोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी सरकारनेही काही प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह, जीम अशी गर्दीची ठिकाणंही बंद करण्यात आली आहेत. यातच जीम बंद ठेवण्यात आल्यामुळे सध्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस घरीच योगा करत असून तिने सोशल मीडियावर तिचा हॉट योगा व्हिडीओ शेअर केला आहे.
जॅकलीनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हॉट योगा करताना दिसत आहे. योग करत असताना जॅकलीनने परिधान केलेले कपडे आणि तिची योग करण्याची पद्धत यामुळे या योगाला हॉट व्हिडीओ म्हणत असल्याची चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलीन वेगवेगळी योगासने करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ती अत्यंत साधे आणि सहज-सोपी आसनं करत असल्यामुळे ही आसने आपण घरीदेखील सहज करु शकतो.
“स्ट्रेचमुळे तुमचा मणका ताठ राहतो आणि दिवसभरात काम करताना उत्साह कायम राहतो. मला योगा करायला प्रचंड आवडतं. तसंच हा योगप्रकार तुम्ही कुठेही असलात तरी करु शकतात”,असं कॅप्शन जॅकलीनने एका व्हिडीओला दिलं आहे. तर तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.
जॅकलीनने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती गाणी ऐकण्याचा सल्ला देत आहे. “व्यायाम करताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा ती चांगली गाणी ऐकताना श्वास घ्या, तुम्हाला प्रसन्न वाटेल”.
&
View this post on Instagram
Stretch keep that spine healthy and happy! Yoga poses are my fav, anytime, anywhere!
वाचा : करोनानं बॉलिवूडलाही घेरलं; ८०० कोटींचं नुकसान
दरम्यान, जॅकलीन सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अलिकडेच ती ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक आसिम रियाजसोबत एका म्युझिक अल्बममध्ये झळकली होती.