मुंबई – अभीनेत्री जॅकलीन फर्नांडीसचे प्राण्यांवरचे प्रेम हे सर्वांनाच माहित आहे. जॅकलीन डॉग डे करण्याच्या विचारात असून या ऊत्सवाची सुरवात मुंबईतून करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनमध्ये एका ऊत्सवात कुत्र्यांचे मास खातात, त्याकरता तब्बल १० हजार कुत्रे कापले जातात. या घटनेच्या विरोधात जगभरातून प्रतिक्रीया येत आहेत. या घटनेने अस्वस्थ होत जॅकलीनने मुंबईत डॉग डे सेलीब्रेट करण्याचे ठरवले आहे. डॉग डे सेलिब्रेशन ही संकल्पना जॅकलीनला नेपाळमधल्या एका ऊत्सवातून सुचली असल्याचे तीने सांगितले. तसेच कुत्रा हा माणसांशी एकनिष्ठ व इमानदार प्राणी असतो. मला कुत्रे आवडतात त्यांच्या सन्मानार्थ एक दिवस असावा याकरता माझा पाठींबा असेल असे जॅकलीन म्हणाली.