बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आता नवीन रेस्टॉरन्ट सुरु करण्यासाठी सज्ज झाली आहे. जॅकलिनने पुन्हा श्रीलंकेत जाऊन रेस्टॉरन्ट सुरु काढण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली आहे.
आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी उत्सुक असलेली जॅकलीन म्हणाली की, नेहमीच माझ्या डोक्यात रेस्टॉरन्ट सुरु करण्याची कल्पना होती. पण वेळेअभावी ती पूर्ण होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरन्टच्या डिझाइन आणि इन्टेरिअरमध्ये जॅकलीन स्वतः जातीने लक्ष्य देत आहे. जॅकलीन सलमानसोबत किक या चित्रपटात दिसणार आहे. तसेच, ती रणबीर, अर्जुन रामपालसोबतही रॉय चित्रपटातही काम करत आहे.

Story img Loader