बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या चाहत्यांना अनोखी भेट देणार आहे. जॅकलिनची स्वाक्षरी असलेले आणि तिने स्वत: रेखाटलेले छायाचित्र जिंकण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबतच्या रॉय या आगामी चित्रपटात जॅकलिन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल योजनेच्या अंतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रॉय चित्रपटाशी निगडीत काही सोप्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱया चाहत्याला जॅकलिनने रेखाटलेले छायाचित्र तिच्या स्वाक्षरीसहीत भेट म्हणून देण्यात येणार आहे. या अनोख्या संधीची माहिती खुद्द जॅकलिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा