अमेरिकन अभिनेत्रीने जादा कोरीन पिंकीट स्मिथने अनेकदा तिचं भारतीय संस्कृतीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. केवळ बोलण्यामधून हे प्रेम व्यक्त न करता आता आपल्या उजव्या हातावार सीता मातेचा टॅटू गोंदवून घेतलाय. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असण्याबरोबरच स्क्रीनरायटर, निर्माती, टॉक शो होस्ट आणि उद्योजिका असणाऱ्या जादाने या टॅटूचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> सई ताम्हणकरच्या खांद्यावरील त्या Tattoo चा अर्थ तरी काय?; टॅटूशी खास कनेक्शन असणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

४९ वर्षीय जादाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये भविष्यात म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत आपण संपूर्ण हातावर वेगवेगळे टॅटू काढून घेणार आहोत असंही म्हटलं आहे. “मी नेहमी वयाच्या ६० व्या वर्षी टॅटू काढून घेण्याबद्दल सांगते. मात्र भविष्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळेच मी माझ्या हातावर आतापासून टॅटू काढून घेण्यास सुरुवात केलीय. हा एका देवीचा टॅटू असून आपल्या मनातील प्रवासाची आपल्याशिवाय केलेली सुरुवात दर्शवतोय. जय माँ,” अशी कॅप्शन जादाने हा फोटो शेअर करताना दिलीय. तिने काढलेल्या टॅटूमध्ये सीता मातेच्या अग्नीपरिक्षेच्या वेळेचा प्रसंग क्षण दाखवण्यात आला असून जादाने हा टॅटू फेमिनिझम म्हणजेच महिला सामर्थ्याचं प्रतिक असल्याचा उल्लेख केलाय.

जादा ही प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची पत्नी आहे.

जादा ही अनेकदा धार्मिक गोष्टींसंदर्भात पोस्ट करत असते. मध्यंतरी तिने डोक्यावरील सर्व केस काढून टक्कल केलं होतं. या बदलासाठी तिने आपल्या मुलीचे आभार मानले होते. बदल हा आवश्यक असतो असं सांगत तिने आपल्या या नव्या लूकचं समर्थन केलं होतं.

२०१८ मध्ये एका टॉक शो दरम्यान जादाने केस गळण्याच्या समस्येसंदर्भात भाष्य केलं होतं. याच अडचणीमुळे आपण आपला लाँग हेअर लूक चेंज करुन शॉर्ट हेअरकट ठेवण्यास सुरुवात केल्याचं तिनं म्हटलं होतं.

यापूर्वीही जादाने अनेकदा भारतीय संस्कृती आणि अध्यात्मासंदर्भातील पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवरुन केल्यात.

अनेकांनी जादाच्या उजव्या हातावरील या टॅटूचं कौतुक केल्याचं तिच्या पोस्टवरील कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.