प्रभूदेवाचे निर्देशन असणा-या ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटातील ‘जादू की झप्पी’ या आयटम सॉंगवर थिरकणा-या जॅकलीन फर्नांडीझला या गाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाण्याची आशा आहे. या गाण्याचे बोल हे संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या ‘जादू की झप्पी’ या प्रसिद्ध ओळीने प्रेरित असल्याचे गाण्याच्या अनावरणावेळी जॅकलीनने सांगितले.
जॅकलीन म्हणाली की,’जादू की झप्पी’ हे वाक्य संजय दत्त यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहे. त्याचाच आम्ही गाण्यात वापर केला असून प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग आवडेल. मी असे गाणे यापूर्वी न केल्यामुळे माझ्या मनात फार भीती होती. पण, गाणे ऐकल्यावर ते मला आवडले आणि प्रभूदेवासोबत नृत्य करण्याची संधी न गमवता हे आयटम सॉंग करण्याचा मी निर्णय घेतला. सदर गाण्याकरिता जॅकलीनने सात दिवस सराव केला होता. ऐश्वर्या राय बच्चनचे ‘कजरारे’ हे आयटम सॉंग जॅकलीनला आवडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा