‘जग्गा जासूस’ हा चित्रपट सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्य म्हणजे सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या तुलनेत सध्या रणबीरच्या या चित्रपटाबद्दलही चांगल्याच चर्चा रंगत आहेत. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे दोघंही स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे प्रेक्षकांना त्याची ब्रेकअपनंतरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीरचा हा आगामी चित्रपट प्रकाशझोतात आला असून, आता तर किंग खाननेही या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत रणबीर म्हणाला, ‘या चित्रपटाचा टिझर ज्यावेळी प्रदर्शित झाला तेव्हाच शाहरुख सरांनी मला आणि अनुराग सरांना फोन करुन चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली होती.’ शाहरुखने दिलेल्या पाठिंब्याबद्दल रणबीरने त्याचे मनापासून आभार मानले.

वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’

रणबीर आणि कतरिना एकाच चित्रपटात काम करणार आणि त्यांच्या ब्रेकअपविषयीच्या चर्चा होणार नाहीत असं फार क्वचितच पाहायला मिळतं. यासंदर्भात आपल्या पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिनाविषयी सांगताना रणबीर म्हणाला, ‘त्या वेळी माझ्या ज्या काही भावना होत्या, मला जे काही वाटत होतं, ते सर्व आता संपलं आहे. मला आता त्या नकारात्मक गोष्टी माझ्या आयुष्यात परत आणायच्या नाहीयेत. इतकच काय, तर मला त्याबद्दल काहीच बोलायचंही नाहीये. ठिक आहे…. आम्ही दोघंही अभिनेते आहोत. हा आमच्या क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.’

‘डिस्ने’ आणि ‘पिक्चर शुरु प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीरही निर्मिती क्षेत्रात त्याचं नशीब आजमावू पाहात आहे. तेव्हा आता या ‘जग्गा जासूस’ला प्रेक्षक किती प्रेम देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.