रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जग्गा जासूस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. रणबीरने स्वतः या चित्रपटाचा पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पोस्टरमध्ये हे दोघेही चष्मा घातलेले दिसत आहे. अजब ‘प्रेम की गजब कहानी’मधील कतरिनाची हेअरस्टाइल या पोस्टरमध्ये पाहावयास मिळते. या चित्रपटात आपल्याला रणबीरचा १९ ते ४० असा प्रवास पाहायला मिळणार आहे. तो यात त्याच्या बेपत्ता वडिलांचा शोध घेताना दिसेल. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
‘जग्गा जासूस’चा फर्स्ट लूक
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जग्गा जासूस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
![जग्गा जासूसमध्ये रणबीर एका हेराची भूमिका साकारत आहे.](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/12/jagga-jasoos-7592.jpg?w=1024)
First published on: 22-12-2014 at 11:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagga jasoos first look revealed katrina kaif ranbir kapoor look geeky