बॉलिवूडच्या शंभर कोटींच्या उड्डाणांची शर्यत यंदा देखील पाहायला मिळणार आहे. अमिर, शाहरूख आणि सलमान यांनी २०१३ मध्ये तिकिट बारीवर चमक दाखवली. या वर्षी २०१४ मध्ये देखील हे तगडे स्टार तिकीट बारीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. मात्र, २०१४मध्ये खानदानीच टक्कर असणार असे देखील नाही. कारण माधुरी आणि नसुरूद्दीन शहा यांचा ‘डेढ इश्किया’ चित्रपट देखिल स्पर्धेमध्ये असणार आहे.
सलमान खान दिड वर्षांच्या प्रदीर्घ अज्ञातवासातून पुन्हा एकदा ‘जय हो’ म्हणत २४ जानेवारीला मोठ्या पडद्यावर परतत आहे. सोहेल खानने दिग्दर्शित केलेल्या ‘जय हो’ चित्रपटामध्ये सलमानने बलदंड सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे.
बऱ्याच वर्षांनी ‘जय हो’मधून डॅनी खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
अमिर देखील ‘धूम ३’ च्या यशानंतर २०१४ साठी सज्ज झाला आहे. ‘३ इडियटस्’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत अमिर ‘पीके’ चित्रपट करत आहे. अमिरचा हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.
गेल्या वर्षीच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशा नंतर किंग खानचा या वर्षी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपट येत आहे.
बॉलिवूडचे २०१४ चे कॅलेंडर तयार!
बॉलिवूडच्या शंभर कोटींच्या उड्डाणांची शर्यत यंदा देखील पाहायला मिळणार आहे. अमिर, शाहरूख आणि सलमान यांनी २०१३ मध्ये तिकिट बारीवर चमक दाखवली
First published on: 01-01-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jai ho dedh ishqiya peekay crowded movie calender for