बॉलिवूड स्टार सलमान खान हा त्याचा भाऊ सोहेल खान याने दिग्दर्शित केलेल्या ‘जय हो’ या चित्रपटामधून रूपेरी पडद्यावर परतत आहे. ‘जय हो’ चित्रपट हा सलमानचा मारधाडपट असून, सलमानचे चाहते या चित्रपटाची अतूरतेने वाट पाहात आहेत. मात्र, ‘जय हो’ची वाट पाहाण्याचे दिवस संपले असून, दोनच दिवसांत म्हणजे येत्या शुक्रवारी ‘जय हो’ चित्रपटगृहांमधून धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही सलमानचा ‘जय हो’ चित्रपट आवर्जून का पाहावा याची आम्ही याठिकाणी पाच कारणे देत आहोत.
१. सलमानला तुम्ही याआधी दोन वर्षांपूर्वी २०१२ मध्ये मोठ्यापडद्यावर ‘दबंग २’ चित्रपटामध्ये पाहिले. गेल्या वर्षी बॉलिवूड ‘खान’दानातील इतर दोन खान शाहरूख आणि अमिर यांनी तिकीट बारीवर त्यांचा करिष्मा दाखवला आहे. आता तिकीट खिडकीवर चमत्कार घडवण्याची सलमानची बारी आहे. ‘जय हो’ चित्रपट नव्या वर्षातील दुसरा मोठा चित्रपट आहे.
२. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील यशामुळे सध्या ‘आम आदमी’चा देशभर बोलबाला आहे. सामान्यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करण्याची कोणातही सध्या हिम्मत नाही. एका दुरचित्रवाणी कार्यक्रमात सलमान देखील ‘जय हो’ ही सामान्य मानसाच्या बदल्याची कहानी असल्याचे म्हणाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या बरोबर दोन दिवस आधी ‘जय हो’ प्रदर्शित होत असल्यामुळे या चित्रपटाकडून देशभक्तिपर प्रेरणा मिळणार आहे.
३. बॉलिवूडची चतुरस्त्र अभिनेत्री तब्बू देखील तिच्या ‘लाईफ ऑफ पाय’ (२०१२) नंतर दोन वर्षांनी रूपेरी पडद्यावर परतत आहे. ‘जय हो’ मध्ये तब्बू सलमानच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकतेच अमिर खान याने त्याला देखील ‘जय हो’ पाहाण्याची उत्सुकता लागली असल्याचे म्हटले होते. त्याने ‘जय हो’ बद्दल अनेक वेळा ट्विटवर देखील उल्लेख केला असून, सलमानला प्रदर्शनपूर्व स्क्रिनिंगबद्दल विचारले आहे. “सलमान मी तुझ्या चित्रपटाची वाट पाहात आहे. प्रदर्शनापूर्वीच दाखव माझ्या भावा…जय हो!!,” या आशयाचा ट्विट अमिरने केला आहे.
५. सलमान खानने या आधी बॉलिवूडला सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफ या दोन प्रतिभावंत अभिनेत्र्यांना पदार्पणाची संधी देत ओळख करून दिली. यावेळी डेझी शाह या नव्या चेहऱ्याला घेऊन सलमान आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी डेझी सलमान बद्दल भरभरून बोलताना दिसत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा