रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये दमदार ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: रजनीकांत यांच्या चाहत्यांची दोघांना जबर मारहाण, कारण वाचून तुमचाही होईल संताप

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या अंदाजानुसार गुरुवारी पहिल्या दिवशी जेलरने ५२ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यांतील ३ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा चित्रपट तमिळनाडू आणि केरळमध्ये २०२३ मधील सर्वात मोठी ओपनिंग करण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील कोणत्याही तमिळ चित्रपटांपेक्षा सर्वाधिक ओपनिंग नोंदवली आहे.

जबरा फॅन! जपानी चाहता रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी पत्नीसह भारतात पोहोचला; म्हणाला…

चित्रपट वितरक आणि तमिळनाडूच्या थिएटर ओनर्स असोसिएशनचे प्रमुख तिरुपूर सुब्रमण्यम यांनी पीटीआयला चित्रपटाबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यात ९०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात आहे. चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त चाहते आनंद साजरा करत आहेत.

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

नेल्सन दिग्दर्शित मध्ये रजनीकांत जेलर ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत आणि मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jailer box office collection day 1 rajinikanth film records 52 crore earning hrc
Show comments