G Marimuthu passed away : मागच्या आठवड्यात लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री अपर्णा पी नायर राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती, त्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. लोकप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे आज (८ सप्टेंबर रोजी) वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदविकाराचा झटका आला होता.

‘जवान’ची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

जी मारीमुथू ‘इथिर नीचल’ या त्यांच्या टेलिव्हिजन शोचे डबिंग करताना ते कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मारीमुथू हे रजनीकांत यांच्या ‘जेलर’ आणि ‘रेड सँडल वुड’मध्ये होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं अकिलन आणि ऐश्वर्या आहेत. विजय सेतुपतीने त्यांच्या निधनाबद्दल ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी मारीमुथू त्यांचे सहकारी कमलेशसह त्याच्या टीव्ही शो ‘इथिर नीचल’साठी डबिंग करत होते. डबिंग करताना ते चेन्नईतील स्टुडिओत कोसळले. त्यांना वडापलानी येथील एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. इथून त्यांचे पार्थिव त्यांच्या चेन्नईतील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी थेनी येथे नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

“त्यांना मतं मांडण्याचा हक्क”, उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावर कमल हासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तमिळनाडू हे…”

मारीमुथू यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की कॉलिवूडमध्ये दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न घेऊन ते थेनी येथील त्याच्या घरातून पळून गेले होते. २००८ मध्ये ‘कन्नम कन्नम’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्माते म्हणून पदार्पण केले. चित्रपट दिग्दर्शित करण्याव्यतिरिक्त त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अनेक भूमिकाही केल्या. त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ‘वाली’, ‘जीवा’, ‘परीयेरम पेरुमल’ आणि ‘जेलर’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

Story img Loader