रजनीकांत या नावाची जादू आपण नुकतीच बॉक्स ऑफिसवर अनुभवली आहोत. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. चित्रपटाने जवळपास ६०० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांत यांचे सगळेच चाहते याचा आनंद साजरा करत आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

नुकताच हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते व सन पिक्चर्सचे सर्वेसर्वा कलानिधी मारन यांनी चित्रपटाच्या संपूर्ण ३०० क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Success Story Of Krishna Arora In Marathi
Success Story: कोण आहे कृष्णा अरोरा? ज्याने २५ व्या वर्षी खरेदी केली स्वतःची करोडोंची कार; वाचा, ‘त्याची’ गोष्ट

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दलची ‘ही’ ४ सिक्रेट्स तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्या

चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश आणि बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई यासाठी सगळ्यांचे आभार मानायचे म्हणून कलानिधी यांनी ही सोन्याची नाणी चित्रपटावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना भेट दिल्याचं स्पष्ट झालं आहे. चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल माहिती दिली.

याआधी चित्रपटाची कामगिरी पाहता कलानिधी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना ब्रँड न्यू BMW X7 ही गाडी भेट म्हणून दिल्याची जबरदस्त चर्चा झाली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी दिग्दर्शक नेल्सन यांनाही पोर्शची गाडी भेट दिली होती. याखेरीज ‘जेलर’साठी रजनीकांत यांना दिलेला धनादेश १०० कोटींचा असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी त्यांना चित्रपटासाठी मानधन म्हणून ११० कोटी रुपये मिळाले आहेत.

Story img Loader