‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका गेली १४ वर्षे सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. काही कलाकारांच्या जागी नवीन कलाकार आले आणि त्यांनी भूमिका साकारल्या. पण नुकतेच या मालिकेतील सर्वात महत्वाची म्हणजेच तारक मेहता यांची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली. त्यांनी निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे मालिका सोडल्याचीही चर्चा आहे. तसेच शैलेश लोढा मालिकेत परत येतील, अशीही चर्चा होती. पण यापैकी कोणतीही गोष्ट घडली नसून या मालिकेत शैलेश यांच्या जागी नवीन अभिनेता तारक मेहताची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा – “जगभरातील प्रेक्षकांना…”; बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याची कारणं सांगत फरहान अख्तरने व्यक्त केलं मत
ETimes च्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी तारक मेहता या भूमिकेसाठी जैनीराज राजपुरोहित यांच्याशी संपर्क साधला आहे. निर्माते जैनीराज यांच्या नावाबद्दल विचार करत असून येत्या काळात ते ही भूमिका साकारताना दिसतील, असं म्हटलं जातंय. शैलेश लोढा यांनी शोचे शूटिंग थांबवल्यानंतर निर्माते त्यांच्या परतण्याची वाट पाहत होते. पण तसं झालं नाही. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसने शैलेश लोढा यांच्या जागी नवीन कलाकाराचा शोध सुरू केला. सध्या जैनीराज राजपुरोहित यांच्या नावाची या भूमिकेसाठी चर्चा आहे. पण याबद्दल निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा – VIDEO: ‘लग्नाला उशीर का करतीयेस?’ अमिताभ यांनी विचारलेल्या या प्रश्नावर स्पर्धक ऐश्वर्याने दिलं मजेशीर उत्तर
जैनीराज राजपुरोहित यांनी टीव्ही मालिकांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. बालिका वधू, लागी तुझसे लगन, मिले जब हम तुम यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. तसेच ओ माय गॉड आणि आऊटसोर्स या चित्रपटातही ते दिसले होते.
हेही वाचा – भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी गायिकेचा अपमान; प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे थांबवावं लागलं गाणं
रिपोर्ट्सनुसार, सीरियलचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढा यांना शो सोडू नये, म्हणून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आलं नाही. शैलेश यांच्या आधी दिशा वकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंह, भव्य गांधी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हा शो सोडला आहे.