कच्छच्या वाळवंटामधील पाण्याच्या समस्येवर बनवलेला ‘जल’ चित्रपट ६६ व्या कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मल्लिक यांचे असून, पूरब कोहली आणि तनीषा चॅटर्जी यांच्या प्रमूख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ मे रोजी कान चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे.
मल्लिक म्हणाले की, वन वर्ल्ड फिल्म्समध्ये आम्हाला आणि आमचे आंतरराष्ट्रीय विक्री सहयोगी इनसोम्नियावर्ल्ड सेल्स, एनएफडीसी यांना भारतीय सिनेमाच्या १०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने इतक्या प्रतिष्ठीत महोत्सवात चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली मानतो.
कान चित्रपट महोत्सवात ‘जल’
कच्छच्या वाळवंटामधील पाण्याच्या समस्येवर बनवलेला 'जल' चित्रपट ६६ व्या कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मल्लिक यांचे असून, पूरब कोहली आणि तनीषा चॅटर्जी यांच्या प्रमूख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ मे रोजी कान चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे.
First published on: 21-05-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jal to be screened at cannes film festival