हॉलिवूड स्टार डॅनियल क्रेग हा त्याच्या ‘जेम्स बाँड’ या चित्रपटामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचे अनेक भाग प्रदर्शित झाले. त्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘जेम्स बाँड’च्या सगळ्या चित्रपटांत डॅनियल क्रेग याने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. आता त्याने मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्याला एक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली…’लायगर’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन ‘या’ दिवशी होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल

चित्रपट आणि रंगभूमीवरील डॅनियल क्रेगच्या योगदानाबद्दल त्याला विंडसर कॅसल येथे कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकल अँड सेंट जॉर्ज (सीएमजी) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहसा हा पुरस्कार ब्रिटनच्या राणीकडून खऱ्या हेरांना दिला जातो. पण डॅनियल क्रेगला त्याच्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. असा पहिलाच अभिनेता बनला, ज्याला हा पुरस्कार मिळाला आहे. रॉयल फॅमिलीच्या ट्विटर अकाऊंटवरून या समारंभादरम्यानचा एक फोटो पोस्ट करत याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा : जेम्स बाँड डॅनियल क्रेगची रॉयल नेव्ही कमांडर म्हणून नियुक्ती

लेखक इयान फ्लेमिंग यांनी लिहिलेल्या जेम्स बाँड या पत्रालादेखील चित्रपटात हाच पुरस्कार देण्यात आला होता. डॅनियल क्रेगने १९९२ साली ‘द पॉवर ऑफ वन’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘चेस्टर’, ‘जेम्स बाँड’ व्यतिरिक्त ‘कॅसिनो रॉयल’ आणि ‘नो टाइम टू डाय’ ‘अ किड इन किंग आर्थर कोर्ट’, ‘अवर फ्रेंड इन द नॉर्थ’, ‘एलिझाबेथ’, ‘लारा क्रॉफ्ट’ आणि ‘लायर केक’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. तसेच गेल्या वर्षी डॅनियल क्रेगची रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.