जेम्स बॉंण्ड हा गुप्तहेर आणि त्याच्या अचाट पराक्रमांनी भारलेल्या या बॉण्डपटांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने थेट ‘अॅकॅडमी अॅवॉर्ड्स’ (ऑस्कर) सोहळ्यात या बॉण्डपटांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला डॅनिएल क्रेग अभिनित ‘स्कायफॉल’ या बॉण्डपटाने पहिल्यांदा एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करत रेकॉर्ड केला आणि बॉण्डपटांचे पन्नासावे वर्ष मैलाचा दगड ठरले. १९६२ साली ‘डॉ. नो’ हा पहिला बॉण्डपट प्रदर्शित झाला होता.
ऑस्कर सोहळ्यात बॉण्डपटांचे कौतुक करणारा विशेष भाग दाखवला जाणार आहे, असे सोहळ्याचे आयोजक क्रेग झेदान आणि नेल मेरॉन यांनी म्हटले आहे. सलग पन्नास वर्ष चालू असलेले आणि कमालीचे यशस्वी ठरलेले सिक्वलपट म्हणून बॉण्डपटांना जागतिक स्तरावर लौकिक मिळाला आहे. हा प्रतिष्ठेचा ऑस्कर सोहळा २४ फेब्रुवारी २०१३ रोजी हॉलिवुड अॅंड हायलॅंड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार असून या पुरस्कारांसाठीची नामांकने १० जानेवारी रोजी घोषित केली जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा