टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही बेपत्ता झालेली पाणबुडी चार दिवसांनी सापडली आहे. पण, त्यातील पाचही अभ्यासकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी १८ जून रोजी समुद्राच्या तळाशी झेपावलेल्या या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली होती. शोधमोहिमेत त्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत, अशी माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे.

टायटन पाणबुडीत जीव गमावणारे ‘ते’ पाच अभ्यासक कोण होते? १९ वर्षीय तरुणासह त्याच्या वडिलांचाही समावेश

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”

या दुर्घटनेत ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचे निधन झाले आहे. या दुर्घटनेवर ‘टायटॅनिक’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कधीही न विसरता येणारी भयंकर दुर्घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू, जहाजाजवळ सापडले पाणबुडीचे तुकडे

जेम्स कॅमेरून म्हणाले, ‘पीडितांच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकत नाही. गेल्या ४ दिवसांपासून त्या लोकांना खोटी आशा दिली जात होती. पीडितांच्या कुटुंबीयांसाठी ही परिस्थिती खूप भयंकर आहे आणि ही घटना पुढची कित्येक वर्षे विसरता येणार नाही. अनेक अभ्यासकांनी ओशनगेट मोहिम राबवणाऱ्यांना पत्रे लिहिली होती आणि चेतावणी दिली होती की त्यांची पाणबुडी खूप प्रायोगिक आहे. खोल समुद्रात शोध घेणाऱ्या अभियांत्रिकी फिल्डमधील लोकांनीही कंपनीला पत्र लिहून ही पाणबुडी प्रवाशांना वाहून नेण्यास योग्य नसल्याचा इशारा दिला होता. या पाणबुडीची आणखी तपासणी करणं आवश्यक होतं,” असंही कॅमेरून म्हणाले.

“त्याला जायचं नव्हतं, तो घाबरला होता पण..”, टायटन स्फोटात मृत्यू झालेल्या पाकिस्तानी पिता-पुत्राबाबत काय म्हणाले कुटुंबीय?

या घटनेत जीव गमावणारे पॉल-हेन्री नार्गोलेट हे जेम्स कॅमेरून यांचे खूप चांगले मित्र होते. दोघांची २५ वर्षांची मैत्री होती. समुद्रात अशा प्रकारे डाइव्ह घेण्याआधी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे, असं त्यांनी नमूद केलं. १११ पूर्वी घडलेल्या टायटॅनिक दुर्घटनेची आठवण करून देताना जेम्स कॅमेरून म्हणाले, “ही घटना पाहून पुन्हा एकदा टायटॅनिकच्या दुर्घटनेची आठवण झाली, जेव्हा टायटॅनिक जहाजाच्या कॅप्टनने सुरक्षेसंदर्भातील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं होतं. परिणामी जहाज एका मोठ्या हिमखंडाशी धडकले आणि या अपघातात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता.”

Story img Loader