भारतातील जम्मू काश्मीरमधील १३ वर्षांच्या अर्शिया शर्माचा जलवा विदेशात पाहायला मिळाला आहे. या चिमुरडीने ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिला की परीक्षकही आश्चर्यचकित झाले. अर्शियाच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं खूप कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू आणि काश्मीरमधील अर्शिया शर्मा या १३ वर्षांच्या मुलीने ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ या टॅलेंट शोच्या परिक्षकांना खुर्चीवरून उभे राहून टाळ्या वाजवायला भाग पाडलं, इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या शोचा १९ वा सीझन २८ मे रोजी प्रदर्शित झाला. या शोमध्ये अर्शियाने आंतरराष्ट्रीय मंचावर केलेल्या परफॉर्मन्सची सगळीकडे चर्चा होत आहे.

आडनाव हटवले, फोटो डिलीट केले; लष्करी अधिकारी पतीपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली…

या मंचावरचा अर्शियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यात, अर्शियाने ती मूळ जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे, अशी तिची ओळख करून दिली आहे. अर्शिया म्हणते ती की ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट २०२४’ च्या मंचावर येण्यापूर्वी कधीही भारताबाहेर गेली नव्हती. पहिल्यांदाच भारतबाहेर प्रवास केला आणि इतक्या दूर येईपर्यंत विमानात बसून मी थकून गेले, असं अर्शिया मंचावर म्हणाली. “मी भारतातील जम्मू- काश्मीरची रहिवासी आहे. मी एक डान्सर आहे, परंतु मी मला इतरांसारखं व्हायचं नाही, त्यामुळे मी माझ्या डान्समध्ये जिम्नॅस्टिक व काही फ्लेक्झिबल मूव्हज जोडले आहेत,” असं अर्शिया व्हिडीओत म्हणताना दिसते.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

शोचे परीक्षक सायमन कॉवेल, हेडी क्लम, हॉवी मँडल आणि सोफिया व्हर्गारा आर्शियाबरोबर गप्पा मारताना दिसले आणि ते अर्शियाच्या आत्मविश्वासाने तिचा डान्स पाहण्यासाठी उत्सुक झाल्याचं पाहायला मिळालं.

बाबाचं आडनाव हटवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची कोर्टात धाव, १८ वर्षांची होताच घेतला मोठा निर्णय

सुरुवातीला साध्या कपड्यांवर मंचावर आलेली अर्शिया नंतरही सुंदर ड्रेस घालून येईल आणि डान्स करेल, असं परिक्षकांना वाटलं होतं. पण तिचं भयानक रूप आणि जबरदस्त डान्स पाहून परिक्षक भारावून गेले. इतकंच नाही तर तिच्यासाठी प्रेक्षक सतत टाळ्या वाजवत होते. अर्शियाच्या परफॉर्मन्सने प्रभावित झालेल्या चारही परिक्षकांनी तिला स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यासाठी निवडलं.

“तुझं सामान ने, नाहीतर दान करेन,” अभिनेत्री घर सोडून आल्यावर दुसऱ्या पतीने सुनावलं, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

या आंतरराष्ट्रीय शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी अर्शिया शर्माने ‘डीआयडी लिटल मास्टर्स’ आणि ‘सुपर डान्सर ४’ सारख्या शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्येही तिने तिच्या जबरदस्त डान्स व कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. अर्शिया ही उत्तम जिम्नॅस्ट आहे. तिला तिच्या जिम्नॅस्टिक कौशल्यांसाठी सुवर्ण पदक मिळालं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir girl arshiya sharma performance at americas got talent judges standing ovation hrc
Show comments