जान्हवी कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘धडक’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली होती. याशिवाय जान्हवी कपूर ‘गुंजन सक्सेना’मध्येही दिसली होती. हा चित्रपटदेखील करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार झाला होता. याच कारणामुळे जान्हवी कपूरला अनेकदा ट्रोल केलं गेलं. पण आता जान्हवी कपूरने या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसंच धर्माने लॉन्च केल्यामुळे तिला सर्वत्र द्वेषाला समोरं जावं लागलं हेही तिने मान्य केलं.
जान्हवी कपूरने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, “धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित असल्यामुळे तिला सहज ट्रोल केले जाते का?” यावर “मला वाटते की ही गोष्ट घडते कारण धर्मा हे एक नामांकित प्रॉडक्शन हाऊस आहे,” असं उत्तर तिने दिलं.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बहुप्रतीक्षित ‘पठाण’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट
जान्हवी म्हणाली, “माझ्या लक्षात आले आहे, लोक जे काही बोलतात ते धर्मा प्रोडक्शन जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळेच. एकत्र काम केल्यामुळे मी सहज द्वेषाचा बळी ठरली आहे. करण जोहरच्या सल्ल्यानुसार अभिनय कारकीर्द सुरू केल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला क्षणभरही पश्चाताप झाला नाही. कारण धर्मा आणि करण जोहर यांनी मला जे काही दिलं ते भाग्यवानांनाच कृपया.”
हेही वाचा : विजय देवरकोंडाच्या लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यावर जान्हवी कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली, “आम्ही दोघं…”
जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे. त्यामुळे तिला स्टारकिडच्या मुद्द्यावर बरंच ट्रोल केलं गेलं. अलीकडेच तिचा ‘मिली’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याचबरोबर जान्हवीकडे आता दोन मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये ‘बावल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.