बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरने शनिवारी रात्री करण बुलानीशी लग्न केले. त्यानंतर त्यांच्या रिसेप्शनच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रियाच्या काकाच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरने देखील यावेळी हजेरी लावली होती. त्या दोघींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवी आणि खुशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

खुशी आणि जान्हवीचे हे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. अनिल कपूर यांच्या जुहुच्या घरी रिया आणि करणचं लग्न झालं. त्यानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. आपल्या बहिणीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये परिधान केलेले कपडे प्रेक्षकांना आवडले नाही त्यांनी या दोघींना ट्रोल करायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जान्हवी अनिल कपूर यांच्या घरासमोर गाडीतून उतरताना दिसत आहे. जान्हवीने निळ्या रंगाचा ट्यूब टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर खुशीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. आता जान्हवी आणि खुशीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

janhvi kapoor, khushi kapoor,
या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी जान्हवी आणि खुशीला ट्रोल केलं आहे.

 

जान्हवी आणि खुशीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘लग्नात असे कपडे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लग्नात गेली की बीचवर हे काय कपडे परिधान केले आहेत?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘या सेलिब्रिटींना कोणते कपडे परिधान करायचे हे कळतं नाही, कार्यक्रमाप्रमाणे कपडे परिधान करत नाही…हे तर वेगळ्याच प्रकारचं लग्न आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘या दोघी बहिणी नक्की लग्नासाठी तयार झाल्या आहेत?’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी जान्हवी आणि खुशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Story img Loader